13 ते 15 ऑगस्ट रात्रीसुध्दा फडकणार घरावर झेंडा
जिल्हाधिका-यांकडून 'हर घर झेंडा' अभियानचा आढावा
चंद्रपूर, दि. 26 जुलै : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियान राबविण्यात येत आहे. या तीन दिवसांत घरावरील तिरंगा झेंडा रात्रीसुद्धा डौलाने फडकवत ठेवता येणार आहे....
चंद्रपुरसह 9 महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत
मुंबई, दि. 26 (रानिआ) : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार...
प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर प्लास्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा
मुंबई, दि. 26 : प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक बंदी...
गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप!
धनोजे कुणबी समाज मंडळाद्वारे सत्कार सोहळा
चंद्रपूर : समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, विविध क्षेत्रातील माहिती व्हावी, तळागाळातील समाजबांधवांनी समाजामध्येच नाही तर देशामध्ये नाव कमवावे या उद्देशाने येथील धनोजे कुणबी समाज मंदिर चंद्रपूरतर्फे गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील...
चंद्रपुरसह नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची ‘या’ तारखेला प्रसिद्धी
मुंबई, दि. 25 (रानिआ) : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 22 ऑगस्ट 2022 पर्यंत हरकती व...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या चंद्रपुरात, जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करणार
नागपूर दि. १८ : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे रात्री साडेआठच्या सुमारास आगमन झाले. श्री. फडणवीस उद्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करतील.
नागपूर विमानतळावर उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी , नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,जिल्हाधिकारी आर....
राज्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
मुंबई, दि. 14 (रानिआ) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली.
राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022 रोजी या निवडणुकांची घोषणा केली होती. स्थानिक...