श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल ” दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई तर्फे “सर्वोत्कृष्ट बँक” म्हणून द्वित्तीय पुरस्कार” प्राप्त झाला. सदरचा पुरस्कार हा आर्थिक वर्ष 2022 2023 मध्ये बँकेने बँकेचे अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय आईंचवार यांचे कणखर नेतृत्व व बहुमोल मार्गदर्शनात उल्लेखनिय व उत्कृष्ट अशी भरीव आर्थिक कामगिरी केलेली असल्याने, सदरचा पुरस्कार बँकेला मुंबई येथे झालेल्या समारंभात बँकेचे अध्यक्ष डॉ. विजय आईंचवार, श्री संतोष चिल्लरवार, उपाध्यक्ष, श्री राजीव गोलीवार, श्री जयंत बोनगिरवार, श्री सुमेध कोतपल्लीवार, श्री उमेश वासलवार, संचालक यांनी बँकेतर्फे स्विकाला.

Banco Blue Ribbon Award” ने National Award देऊन गौरविण्यात आले. दमन येथे बँकेचे अध्यक्ष डॉ. विजय आईचवार, श्री सुमेध कोतपल्लीवार, डॉ. सुनिल साकुरे, सिए. श्री अजय मामीडवार, संचालक यांनी बँकेतर्फे स्विकारले. बँकेला प्राप्त झालेल्या दोन्ही पुरस्काराबद्दल आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. विजय आईंचवार म्हणाले की, एकाच आर्थिक वर्षाकरिता बँकेने केलेल्या कामकाजाचा हा गौरव असून एकाच आर्थिक वर्षात दोन पुरस्काराने सन्मानित होण्याचा बहुमान बँकेला मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून ही आपल्या कार्याची पावती आहे. यापुढेही या बँकेचे सर्वांगीण विकासाकरिता आपण प्रयत्नरत असून बँकेचे सर्व संचालक, संचालिका, सभासद, ग्राहक तथा बँकेचे अधिकारी, कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने नक्कीच सतत प्रगती पथावर राहील अशी भावना व्यक्त केली. या पुरस्कार प्राप्तीबद्दल बँकेचे सभासद व ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here