चंद्रपूर,2 सप्टेंबर
दि.०१ सप्टेम्बर ते ०६ सप्टेम्बर २०२० या दरम्यान JEE-2020 ही परीक्षा होऊ घातली आहे, चंद्रपुर जिल्ह्यात ह्या परिक्षेचे परीक्षा केंद्रे दिलेली आहेत.
ही परीक्षा देणाऱ्यांची मोठी संख्या आहे,पण नैसर्गिक आपत्ती मुळे चंद्रपुर जिल्ह्यातील तहसील ब्रम्हपुरी व लगतचा भाग तसेच सम्पुर्ण गडचिरोली जिल्ह्यातील मोठा विद्यार्थी वर्ग वाहतूक व्यवस्था व या भयाण आपत्तींमुळे या परीक्षेला मुकण्याची भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे या गोष्टीचा त्वरीत विचार करून विद्यार्थ्यांचा सर्वेक्षण करून फेरपरीक्षा किंवा तत्सम व्यवस्था करण्यात यावी तसेच हेल्पलाइन तयार करावी अशी मागणी अभाविप ने दिनांक 1 सप्टेंबर 2020 रोजी चंद्रपूर चे जिल्हाधिकारी यांना केली.तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध करावी,लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था,सर्व परीक्षा केंद्रे नियमानुसार योग्य सैनिटाइज करून घ्यावे असे ही सांगण्यात आले.या संदर्भात निवेदन ही दिले, सोबतच यावेळी अभाविप चे जिल्हा संयोजक प्रवीण गिलबिले,महानगरमंत्री शुभम निंबाळकर,शैलेश दिंडेवार,रोहित खेडेकर,रिषिकेश बनकर,निशिकांत आष्टांकार व दामोदर द्विवेदी उपस्थित होते.