घुग्घुस :- चंद्रपूर जिल्ह्यात 03 सप्टेंबर पासून पाच दिवसांचा कडक लॉकडाउन करण्याचे शासन दरबारी प्रस्तावित आहे.मात्र घुग्घुस शहरात दहा – बारा दिवसांपूर्वीच पांच दिवसाचा कडक लॉक डाउन करण्यात आलेला आहे.
त्यामुळे या लॉकडाउन मधून घुग्घुस शहराला वगळण्यात यावे याकरिता घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते सय्यद अनवर, अजय उपाध्ये, यांनी 02 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
ऑगस्ट महिण्यात 16 ते 20 तारखेला संपूर्ण घुग्घुस येथे कडक लॉकडाऊन घेण्यात आले.
यामुळे औद्योगिक शहरातील रोजंदारी मजूर वर्ग, व्यापारी वर्ग,आणि सर्व जनतेनी ऐन सणासुदीला देखील प्रशासनाला संपूर्ण सहयोग करून लॉकडाउन यशस्वी केले.
मात्र जेमतेम 12 ते 13 दिवसात पुन्हा पांच दिवसीय लॉकडाउन आर्थिक दृष्ट्या कुणालाही परवडणारे नाहीत.
हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीची वाताहत होऊन उपासमार होण्याची परिस्थिती उदभवणार आहे.
कृपया 03 सप्टेंबर 2020 पासुन जिल्ह्यात लागू होणाऱ्या लॉकडाउन मधून घुग्घुस शहराला वगळण्यात यावे अशी मागणी केली.