चंद्रपूर,1 सप्टेंबर:
आम आदमी पार्टी चंद्रपूर चे संस्थापक सदस्य श्री संदीप मधुकर पिंपळकर यांचे आज हार्ट अटॅक ने निधन झाले. त्यामुळे आम आदमी पार्टी चंद्रपूर मध्ये शोककळा पसरली आहे .
चंद्रपूर मध्ये आम आदमी पार्टी स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. 23 मार्चला शहिद दिनी, छत्रपती शाहू महाराज जयंती दिनी, महात्मा फुले जयंती दिनी जेव्हा जेव्हा पार्टी ने रक्तदान शिबीर आयोजित करायचे त्या संपुर्ण कार्यक्रम संदीप पिंपळकर यांच्या देखरेखे खाली आयोजीत होत होता. गोरगरिबांच्या मदतिला सतत धाऊन जाणारा कार्यकर्ता म्हणून असलेली संदीप ची ओळख, जनतेचे जीव वाचवण्यात मोलाचा वाटा तसेच आप च्या सर्व कार्यक्रमा मध्ये सक्रिय असणारे, मनमिळाऊ, हसमुख, आरोग्य हितकारक, कुस्तीगिर आणि समाज सेवे मध्ये तत्पर असणारे , फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करुन समाजाला प्रेरणा देणारा कार्यकर्ता आणि आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्ह्याचे श्रमिक विकास संघटना प्रमुख श्री. संदीप पिंपळकर आप परिवाराला सोडून गेले. त्यांचा मागे त्याची अर्धान्गिनी,मुलगा, आई वडील, तिघे भावंड असा संयुक्त परिवार आहे. श्री. संदीप पिंपळकर यांचा अंत्यविधी शान्तिधाम येथे पार पडला.तद्पश्चात शोक सभेचे आयोजन करुन श्रद्धांजली चा कार्यक्रम घेण्यात आला. उद्या दि.02 सप्टेंबर 2020 ला अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम वढा येथे नियोजित आहे.आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. या वेळी चंद्रपूरच नव्हे तर संपुर्ण जिल्हातुन पार्टी चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.