२१८ कोटी रुपयांच्या बनावट बिलांवरून बोगस आयटीसी दाव्या प्रकरणी तिघांना अटक
राज्य GST पथकाची कारवाई
मुंबई, दि. 29 :- महाराष्ट्र जीएसटीच्या सर्वसमावेशक विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि जीएसटी पोर्टलवर उपलब्ध माहितीद्वारे नवीन नोंदणीकृत करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना विभागाला काही करदात्यांचे 200 कोटींपेक्षा जास्त रकमेचे संशयास्पद व्यावसायिक व्यवहार लक्षात आले.
त्यानंतर 25एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र राज्य जीएसटीच्या पथकांद्वारे उल्हासनगर येथे असलेल्या मे....
महावितरणच्या प्रभावी उपाययोजनांमुळे राज्यातील भारनियमन पूर्णतः आटोक्यात
महाराष्ट्रात सात दिवसांपासून कुठेही भारनियमन नाही
मुंबई, दि.२७ एप्रिल २०२२: कोळसा टंचाई व इतर कारणांमुळे देशव्यापी वीजसंकटामध्ये अनेक राज्य विजेच्या भारनियमनाला तोंड देत आहेत. भारनियमन करीत असलेल्या राज्यांची संख्या दोन दिवसांमध्ये १० वरून १५ वर गेली आहे. मात्र महावितरणच्या प्रभावी...
“डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया” या स्वनियमन संस्थेला माहिती...
चंद्रपूर एक्सप्रेस सह स्वनियमन संस्थेशी संलग्न महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलचा समावेश
नवी दिल्ली (प्रतिनिधी)
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठी धोरण आखले आहे....
राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी
२०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार
मुंबई, दि. ११- संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी २ मे पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी लागू होणार असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सोमवार दि....
भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न
कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांकडून वीज पुरवठ्यात घट
दि. ११ एप्रिल २०२२: विजेच्या मागणीबाबत देशभरात सध्या अभूतपूर्व संकटाची परिस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये सर्वच ग्राहकांना विजेच्या तात्पुरत्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र...
‘लोडशेडिंग’ टाळण्यासाठी राज्य सरकारचा वीज खरेदीचा निर्णय!
मुंबई :राज्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
उन्हाळा आणि सिंचनासाठी राज्यातील वीजेची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यातच कोळसा...
१०२ कोटींच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) घेण्याऱ्या व्यापाऱ्यास अटक
मुंबई दि 7 :- महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभागाने जवळपास 102 कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घेऊन शासनाच्या 14 कोटींचा कर महसुल बुडवणाऱ्या व्यक्तीस अटक केली आहे.
मे. समिक्स पुरवठादार व्यापाऱ्यांकडून 8 कोटींचा महसुल मिळविण्यात...