स्वामी समर्थ सभागृह उत्तम संस्कार केंद्र ठरावे : आ. सुधीर मुनगंटीवार

तुकुम परिसरात स्वामी समर्थ सभागृहाचे लोकार्पण

चंद्रपूर: निःशंक हो, निर्भय हो, मना रे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्यही शक्य करतील स्वामी…असे भक्तगण श्रध्‍देने म्हणतात. स्वामींच्या पुण्यतिथी निमित्ताने सात दिवसांच्या पारायणातून भक्तिमय मार्गाने चालण्याचे बळ प्राप्त होते. या पारायणाच्या सांगतेच्या प्रसंगी सर्वांना सुखी ठेव, आशिर्वाद दे अशी प्रार्थना आपण स्वामींच्या चरणी करतो. हे सभागृह सिमेंट, विटांची एक वास्तू नसून एक उत्तम संस्कार केंद्र ठरावे अशी अपेक्षा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी चंद्रपुरातील तुकुम परिसरातील स्वामी समर्थ सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या पुढाकाराने स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सात दिवसांच्या पारायणाच्या निमित्ताने या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, नगरसेवक अनिल फुलझेले, सौ. शिला चव्‍हाण, सौ. माया उईके, डॉ. भारती दुधानी, सौ. मंजुश्री कासनगोट्टूवार, सौ. प्रज्ञा गंधेवार, पुरूषोत्‍तम सहारे, आमीन शेख, सुधाकर टिकले, अशोकराव सुतार, विजय चिताडे, मनोज पिदुरकर, वासुदेव सादमवार, मिरा पिदुरकर, रामकुमार आकापल्‍लीवार, बंडू गौरकार, आकाश मस्‍के, राकेश बोमनवार यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here