चंद्रपूर: वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व महाराष्ट्र राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे आज नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते 58 वर्षाचे होते. मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसापासून ते आजारी होते त्यांना नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात सांस्कृतिक मंत्री अशी अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. अत्यंत मृदू स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून संजय देवतळे यांची ओळख होती. त्यांच्या मृत्युने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
साप्ताहिक चंद्रपूर एक्सप्रेस व तिवारी परिवार तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!