चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हयात 24 तासात आर.टी.पी.सी.आर. चाचणीचा रिपोर्ट मिळालाच पाहीजे याद़ष्टीने त्वरीत यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचेकडे केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रूग्णसंख्या वाढत असुन म़त्युदर सुध्दा वाढत आहे. सारे चित्र चिंताजनक आहे. ज्या नागरिकांनी आर.टी.पी.सी.आर. चाचणीसाठी स्वॅब दिला त्यांचा रिपोर्ट प्राप्त होण्यासाठी 24 तासापेक्षा जास्त कालावधी लागत आहे. त्यामुळे चाचणीसाठी स्वॅब दिल्यानंतर ती व्यक्ती 3 दिवस मुक्तपणे संचार करत कोरोनाचा प्रसार करण्याचे काम करीत आहे. अशा व्यक्ती कोरोनाचे वाहक ठरत असुन यामुळे कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठया प्रमाणावर वाढ होत आहे. ही एकुणच बाब चिंताजनक आहे.
चंद्रपूर जिल्हयाच्या ग्रामीण भागात तर 4 – 5 दिवसांपर्यंत आर.टी.पी.सी.आर. चाचण्यांचे रिपोर्ट प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीयरित्या वाढ होत आहे. व त्यामुळे म़त्यु सुध्दा वाढत आहे. आर.टी.पी.सी.आर. चाचण्यांचे रिपोर्ट 24 तासात मिळावे याबाबत जिल्हाधिकारी व सर्व संबंधितांशी सातत्याने चर्चा केली असुन याकडे लक्ष दिले जात नाही ही अतिशय गंभीर बाब असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.