चंद्रपूर : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई यांच्याकडे केली आहे.
आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, की महाराष्ट्र सरकारने दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीतच महाराष्ट्राची कोविड परिस्थिती बघता, महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयासोबत सर्वच विद्यार्थी संघटना आहेत. परंतु हा निर्णय घेत असताना अनेक बाबींचा विचार राज्य सरकारने करायला पाहिजे होता. त्यामुळे आज अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत. परंतु त्याचे मूल्यमापन हे कशाच्या आधारावर होणार याबाबत राज्य सरकारने स्पष्ट केले नाही.
कोरोनाच्या प्रादुर्भावात मोठे संकट समोर आले आहे. याच्या सामना करण्याकरिता सर्व लोक पुढे येत आहे. या निर्णय चांगला असला तरी आर्थिक संकटात अनेक लोक सापडले आहे. परीक्षा रद्द केली त्यांचं प्रमाणे विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या परीक्षा शुल्क परत केल्यस गरजू विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित घेण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना केली आहे.