चंद्रपूर: स्थानिकांना रोजगार द्या या प्रमूख मागणी करिता चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार व राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी एकत्रित येत महालक्ष्मी कंपणीवर धडक दिली. यावेळी येथे काम करत असलेला कामगार भुमीपूत्र आहे का याचीही शहानिशा करण्यात आली. तसेच या उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना प्राधाण्य देन्युअत यावे, कामगारांचे पोलिस वेरीफिकेशन करण्यात यावे, देण्याच्या सुचनाही अधिका-यांना करण्यात आल्या.
यावेळी पैनगंगा उपक्षेत्रीय महाप्रबंधक सुभा रेड्डी, गडचांदुरचे पोलीस निरीक्षक गोपाल भारती, कोरपनाचे तहसीलदार हरीश सोमलवार, राजूरा नगराध्यक्ष अरुण धोटे, गाडेगाव विरूरच्या सरपंच गीता राजूरकर, दाताळा सरपंच रविंद्र लोनगाडगे, गाडेगाव उपसरपंच शामला खामनकर, वामन पाटील राजूरकर, अशोक राव, शैलेश लोंखडे, आशिष देरकर, राहूल उमरे, अभय मुनोद, उमेश राजूरकर, सुरेश मालेकर, कलाकार मल्लारप, प्रेम गंगाधरे, विलास सोमलवार, प्रतिक शिवणकर, विलास वनकर, राशीद हुसैन, सलिम शेख, रुपेश झाडे, बाळकृष्ण जुवार, हेरमन जोसेफ, विनोद अनंतवार, मुन्ना जोगी, आकाश बोनगीरवार, आनंद रणशूर, राजेश वर्मा, पुण्यावर्धन मेश्राम, पंकज चिमुरकर, राजेश वर्मा, आनंद इंगळे, आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूरात सर्वत्र वेकोलीच्या कोळसा खाणी आहेत या खाणींमध्ये अनेक खाजगी कंपण्या कार्यरत आहे. या कंपण्यांच्या माध्यमामून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती केल्या जात आहे. असे असले तरी सदर कंपण्यामध्ये रोजगारात परप्रांतीयांना प्राधाण्य दिल्या जात आहे. परिणामी चंद्रपूरातील भुमीपूत्र हक्काच्या रोजगारापासून वंचित आहे. या विरोधात आता चंद्रपूर विधानसभा क्षेत्र व राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार एकत्रीत आले असून आज शनिवारी त्यांच्या वतीने वणी वेकोली एरिया येथील पैनगंगा व मुंगोली खदानी अंतर्गत येत असलेल्या महालक्ष्मी कंपणीवर धडक देण्यात आली. यावेळी येथे काम करत असलेल्या कामगारांच्या रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. सदर कंपण्यांमध्ये रोजगार देतांना स्थानिकांना डावलल्या जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने या कंपण्यांना भेट देत येथील कामाची पाहणी आमदार किशोर जोरगेवार व आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.
अचानक सदर कंपणीमध्ये दोन आमदार पोहचल्याने येथील व्यवस्थापणाची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी येथे काम करत असलेला कामगार स्थानिक भुमीपूत्र आहे का या बाबत शहानिशा करण्यात आली. येथे परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचेही यावेळी लक्षात आले. त्यांनतर दोन्ही आमदारांनी संताप व्यक्त करत येथील उद्योगांमध्ये स्थानिकांनाच रोजगार देण्यात यावा अशा सक्त सुचना कंपणी व्यवस्थापनाला केल्या आहे. यावेळी संबधित अधिका-यांची उपस्थिती होती.