24 तासात 18 नव्याने पॉझिटिव्ह,15 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 16 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 15 बाधीतांनी कोरोनावर मात केली असून 18 नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 23 हजार 256 झाली आहे तर बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 753 आहे.
सध्या 110 बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख सात हजार 318 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 82 हजार 292 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 393 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 355, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या अठरा रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील सात, भद्रावती तालुक्यातील सहा, ब्रम्हपुरी एक, राजूरा एक, कोरपना एक व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here