चंद्रपूर:कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी होत नसतांनाच, या काळात सायबर गुन्हयांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. सोशल मिडीयाद्वारे बनावट फेसबुक प्रोफाईल, मॅसेंजर तयार करुन पैशाची मागणी, व्हॉटसअप द्वारे चॅटींग करुन ब्लॅकमेलींग, ऑनलाईन वॉलेटची, केडीट कार्डची केवायसी, नोकरीचं आमीष अशी विविध कारणं देत सायबर गुन्हेगारांकडून सर्व सामान्य लोकांची फसवणूक होत असल्याची उदाहरणं समोर येऊ लागली आहेत.
त्यातच दिनांक १६/११/२०२० रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने चंद्रपूर जिल्हा पोलीसांची अधिकृत फेसबुक आय डी “SP Chandrapur” वरील प्रोफाईल आणि फोटोची कॉपी करुन त्याच प्रकारे दिसणारी नविन बनावट/खोटी फेसबुक आय डी तयार करुन प्रथम अधिकृत फेसबुक मधील फेसबुक मित्रांना फेन्ड रिक्वेस्ट पाठवुन त्यांना आर्थीक अडचणीचा बहाना करुन पैशाची मागणी करुन गुगलपे, फोन पे द्वारे पैसे पाठविण्यास विनंती करीत असल्याचे निदर्शनास आल्याने या संबंधी पोलीस ठाणे रामनगर येथे अज्ञात इसमांविरुध्द माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीचा तपास सुरु आहे.
तरी आवाहन करण्यात येते की, नागरीकांनी अशा भुलथापास बळी पडून कोणत्याही प्रकारचा आर्थीक व्यवहार करु नये. प्रथम पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील १०० कमांकावर कॉल करुन खात्री करुन अशा प्रकाराची माहिती दयावी.
कोरोना काळात बहुतांश लोक घरुन काम करत आहेत. नोकरी मिळवण्यासाठी सुध्दा लोकांची खटपट सुरु असल्याने नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे सायबर गुन्हे घडत आहे. काही सायबर गुन्हेगार सोशल मिडीयाद्वारे बनावट फेसबुक प्रोफाईल, मॅसेंजर तयार करुन पैशाची मागणी, व्हॉटसअप द्वारे चॅटींग करुन ब्लॅकमेलींग करणे तसेच नोकरीकरीता बनावट वेबसाईट बनवून शासनाच्या विविध योजना असलेली बनावट वेबसाईट तयार करणे, ओएलएक्स फ्रॉड, त्याचप्रमाणे एटीएम, डेबीड कार्ड, केडीट कार्ड केवायसी अपडेट अशी कारणं दाखवत होणाऱ्या फसवणुकीचा प्रयत्न करणार्या ऑनलाईन गुन्हे मध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे.
सदरचे सायबर गुन्हेगार विशेषत: ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण मुलं/मुली यांना लक्ष करत असल्याचे दिसत आहेत. लॉकडाउनच्या काळात ऑनलाईन खरेदीच्या प्रकारात सुध्दा मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी विविध प्रकारची पेमेंट ऑनलाईन करण्यावरच भर देत आहेत. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार खोटया शॉपिंग वेबसाईट ही तयार करुन लोकांची फसवणूक करत आहेत. लॉकडाउनमुळे नोकरी गमावलेल्या व्यक्तींसाठी सरकारकडून भत्ता मिळेल अशी आमिष दाखविली जात असून खोटया वेबसाईट तयार करुन नोकरी गमावलेल्या लोकांना सायबर गुन्हेगार मोठया प्रमाणत लक्ष्य करत आहेत.
पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे यांनी नागरीकांना या निमित्त आवाहन केले की, इंटरनेटवरील वापरकर्त्याच वर्तन तपासून सायबर गुन्हेगार सर्व सामान्य नागरिकांची फसवणूक करित आहे. त्यामुळे सायबर गुन्हयांबद्दल वर्तमानात नसलेली जागरुकता याला कारणीभून ठरत असल्याने याबाबत सर्व सामान्य नागरीकांनी अत्यंत जागरुक राहणे गरजेचे आहे.
त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांनी सायबर साक्षर होवून खालील सुचनाचे पालन करावे.
•फेसबुक वर मित्र असलेले मित्रांची परत फेन्डस रिक्वेस्ट आल्यास, ती तात्काळ स्वीकारु नये, त्याबाबतीत संबंधीतांशी खात्री करुन घ्यावी.
• फेसबुक, व्हॉटसअप द्वारे काही अडचणी दाखवुन पैशाची मागणी झाल्यास, संबंधीतांना प्रत्यक्ष भेटुन त्यांची अडचण जाणुन घ्यावी.
• अशा प्रकारच्या कोणत्याही सोशल मिडीयाचे मागणीवरुन बळी पळू नये.
• आपली वैयक्तिक संवेदनशील माहिती कुणाशीही शेअर करु नये.
• आपला पासवर्ड आठ कॅरेक्टर्सपेक्षा जास्त ठेवणे, त्यामध्ये अंक, चिन्हं आणि कॅपिटल त्याचबरोबर स्मॉल लेटर्सचा वापर करावे.
• पासवर्ड अवघड व लक्षात ठेवणे योग्य आणि ठराविक काळानंतर बदलणे आवश्यक आहे. आपलं बँक अकाउंट नंबर, कस्टमर आयडी, सीव्हीव्ही कोड, एटीएम चा १६ अंकी कमांक व पासवर्ड अनोळखी व्यक्ती ला देवू नये.
• पासवर्ड मध्ये स्वत:ची जन्मतारीख, शाळेचे नांव, मुलांचे नांव ई. सोपे पासवर्ड शक्यतो टाळावेत.
• काम संपल्यावर वापरत असलेला कॅम्पयुटर, लॅपटॉप लॉक करुनच जागेवरुन उठावे.
• ऑनलाईन शॉपीग करतांना स्वत:चा कमप्यूटर, लॅपटॉप किंवा मोबाईल डिव्हाईसचा वापर करावे. कम्प्यूटर व लॅपटापला योग्य अॅन्टीव्हायरस सिस्टीम बसवुन घ्यावे.
• सार्वजनिक ठिकाणचं वाय-फाय वापरणे शक्यतो टाळावे.
• ओएलएक्स वरील जुने वाहन/साहित्य खरेदी करतांना ख्संबंधीतांशी खात्री करुन आर्थीक व्यवहार करावा.
• कोणत्याही संशयीत लिंकवर क्लिक न करणे, त्याचबरोबर अनोळखी ई-मेलच्या अटैचमेंट फाईल डाऊनलोड न करणे, कोणत्याही वेबसाईटला भेट देतांना वेबसाईट स्पेलीग पुन-पुन्हा तपासणे, काहीवेळा स्पेलिंग मध्ये थोडासाबदल करुन बनावट वेबसाईट तयार केल्या जातात.
• सायबर गुन्हयात फसवणूक झाल्यास तात्काळ जवळील पोलीस स्टेशन ला तकार नोंदवून होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीला प्रतिबंध करण्यास मदत करावे.