चंद्रपूर चेम्बर ऑफ कॉमर्सचे आव्हान !
चंद्रपूर : दिपावली ची चाहुल लागली आहे. कोरोनाच्या सावटात येणारी ही दिपावली आहे. खरेदी करायची आहे पण स्वतःच्या व कुटूंबाची काळजी ही घ्यायची आहे. मागील काही दिवसांपासून देशातील नागरिक भितीच्या सावटात जगत आहे. या भितीदायक सावटामध्ये अनेक सण येऊन गेले, नियमांचे पालन करून ते साजरे ही करण्यात आलेत. येता दिपावली ची चाहुल लागली आहे. प्रकाशाच्या या पर्वाला प्रत्येक कुटुंब आनंददायी वातावरणात हा सण साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या सेवेसाठी सर्व बाजारपेठा सजलेल्या आहेत, आपण बाजारात यावे जे हवे आहे, जे हवे-हवेसे आहे ते खरेदी करावे, दुकानात यावे, प्रत्यक्ष पहावे खरेदीचा आनंद घ्यावे. नात्यांना प्रकाश द्यावा, आपले गांव, आपले दुकान, आपले दुकानदार हा आपलेपणा जपावा.
स्थानिक बाजारातुनचं खरेदी करावी म्हणजे खरेदीच्या आनंदासोबतचं देश समृद्धीचे श्रेय ही आपल्यालाचं लाभेल, दिवाळी समृद्धी चा सण आहे, अंधारातुन उजेडात येण्याचा सण आहे. सहकार्याच्या, आपुलकीच्या पणत्या लावा आणी दिवाळी साजरी करा आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडूनचं आपली खरेदी करा असे आवाहन चेम्बर्स ऑफ कॉमर्स च्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.