गेल्या 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू नाही

चंद्रपूर, दि. 8 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू झाला नाही तर 173 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच 161 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 161 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 16 हजार 947 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 173 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 14 हजार 16 झाली आहे. सध्या 2 हजार 679 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 26 हजार 404 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 7 हजार 923 नमुने निगेटीव्ह आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 252 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 236, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सात, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 161 बाधितांमध्ये 90 पुरुष व 71 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 63, पोंभुर्णा तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील एक, चिमूर तालुक्यातील 16, मुल तालुक्यातील तीन, गोंडपिपरी तालुक्यातील पाच, कोरपना तालुक्यातील सहा, ब्रह्मपुरी तालुक्यातील 15, नागभिड तालुक्यातील 9, वरोरा तालुक्यातील 13, भद्रावती तालुक्यातील 11, सिंदेवाही तालुक्यातील सात, राजुरा तालुक्यातील सहा, गडचिरोली चार तर भंडारा येथील एक असे एकूण 161 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील  भिवापुर वॉर्ड, गोपालपुरी,बालाजी वार्ड, जटपुरा वार्ड, पंचशील चौक परिसर, पडोली, गणेश नगर तुकूम, भानापेठ वार्ड, जगन्नाथ बाबा नगर, खुटाळा, वृंदावन नगर, नगीना बाग, वडगाव पद्मापूर, धानोरा पिंपरी, श्रीराम चौक, अरविंद नगर, कैलाश नगर नांदगाव, घुगुस, गंजवार्ड, बाबुपेठ, सुभाष नगर, ऊर्जानगर, द्वारका नगर, सौगात नगर, एकोरी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील दादाभाई नौरोजी वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.राजुरा तालुक्यातील  पेठ वार्ड, पांढरवणी, रमाबाई वार्ड, आर्वी भागातून बाधित पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील आजाद वार्ड, गजानन नगर, बामर्डा, पद्मालया नगर, आशीर्वाद लेआउट, विठ्ठल मंदिर वार्ड, इंद्रा नगरी बोर्डा, जामखुला, गाडगे नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील  विद्यानगर, रेणुका माता चौक, देलनवाडी, झाशी राणी चौक, विदर्भ इस्टेट परिसर, पटेल नगर, नान्होरी, कपिल नगर परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील लोणारा, घोडपेठ, राधाकृष्ण कॉलनी परिसर, सुमठाणा, चंदनखेडा, देऊळवाडा, डिफेन्स चंदा परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी, काटवल, देवाडा, रत्नापूर भागातून बाधित पुढे आले आहे.

नागभीड तालुक्यातील चिधिंचक, शिवनगर, वसुंधरा कॉलनी परिसर, सुलेझरी, सुंदर नगर, देवतक, प्रगती नगर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

चिमूर तालुक्यातील  वडाळा पैकु, गांधी वार्ड, नेरी, तळोधी, टिळक वार्ड, नेहरू चौक परिसर, मासळ, मोटेगाव भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर 6, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील  जनता कॉलेज परिसर, विठ्ठल वाडा भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर, गोरे लेआउट, आवारपूर, हॉस्पिटल वार्ड, मांडे लेआउट भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here