चंद्रपूर : पंजाब अँड महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह अर्थात पीएमसी बँकेला आर्थिक गैरव्यवहारामुळे रिझर्व बँक ऑफ इंडिया एक वर्षाहून अधिक काळ आपल्या अधिपत्याखाली ठेवले होते.
या बँकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे हजारो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये धोक्यात आले. याबाबत लोकसभेत मांडण्यात आलेल्या विधेयकावर १६ संप्टेंबर २०२० ला चर्चेत सहभागी होताना खासदार बाळू धानोरकर यांनी पीएमसी बँकेचे गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळेल काय ? केंद्रीय अर्थमंत्री याबाबत स्पष्ट उत्तर का देत नाहीत ? व हे बिल पारित झाल्यावर तरी या गुंतणूकदारांचे मेहनतीचे पैसे परत मिळतील काय ? असा प्रश्न लोकसभेत पोडतिडकीने मांडला होता. आता या पीएमसी बँकेला नवसंजीवनी देणाऱ्या प्रयत्नांना सुरुवात झाली असून या बँकेचे लवकरच पुनरुजीवन होण्याच्या हालचाली सुरु झाल्याने खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. पी. एम. सी बँकेचे प्रशासकांनी ३ नोव्हेंबर २०२० ला बँकेच्या खातेदारांना उद्देशून पत्रे पाठविली असून गत वर्षभरात बँकेच्या पुनर्रचनेसाठी विविध स्तरावर सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. या प्रकारे संवाद साधल्या गेल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.