चंद्रपूर, दि. 3 नोव्हेंबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे सहा मृत्यू झाले असून 182 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 16 हजार 172 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 134 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 13 हजार 135 झाली आहे. सध्या 2 हजार 795 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून एक लाख 22 हजार 254 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी एक लाख 4 हजार 563 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथील 72 वर्षीय पुरुष, बालाजी वार्ड येथील 51 वर्षीय पुरुष, समाधी वार्ड येथील 42 वर्षीय महिला, बल्लारपूर शहरातील लक्ष्मी नगर वार्ड येथील 65 वर्षीय महिला, भद्रावती येथील 71 वर्षीय पुरुष तर गडचिरोली येथील 68 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 242 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 226, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सात, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 118 पुरूष व 64 महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 55, बल्लारपूर तालुक्यातील 20, चिमूर तालुक्यातील चार, मुल तालुक्यातील तीन, गोंडपिपरी तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील 10, ब्रह्मपुरी तालुक्यातील 10, नागभीड तालुक्यातील पाच, वरोरा तालुक्यातील आठ, भद्रावती तालुक्यातील 35, सिंदेवाही तालुक्यातील आठ, राजुरा तालुक्यातील 10, गडचिरोली 11 तर यवतमाळ व गोंदिया येथील प्रत्येकी एक असे एकूण 182 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील व परिसरातील गजानन मंदिर वार्ड, चव्हाण कॉलनी परिसर, सरकार नगर, तुकडोजी नगर, कृष्णा नगर, नगीना बाग, साईबाबा वार्ड, बापट नगर, गांधी नगर, बाबुपेठ, दुर्गापुर, ताडाळी, भिवापूर, जयराज नगर, हॉस्पिटल वार्ड, शिवाजीनगर, तुकूम, सुमित्रा नगर, ओम नगर, जटपुरा गेट परिसर, विठ्ठल मंदिर वार्ड, उत्तम नगर भागातून बाधित पुढे आले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील लक्ष्मी नगर वार्ड, बिल्ट कॉलनी परिसर, झाकीर हुसेन वार्ड, विसापूर, विवेकानंद वार्ड, सुभाष वार्ड, गांधी वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, गणपती वार्ड, बामणी, संतोषीमाता वार्ड भागातून बाधित ठरले आहे.
वरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्ड, डोंगरगाव रेल्वे, जाजू हॉस्पिटल परिसरातून पाॅझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर, गुरुदेव नगर, नागेश्वर नगर, शेष नगर, देलनवाडी परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील समता नगर, माजरी, चंडिका वार्ड, किल्ला वार्ड, ऑर्दनन्स फॅक्टरी चांदा परिसर, नेताजी नगर, पंचशील नगर, झाडे प्लॉट, पांडव वार्ड, गुरु नगर, राधाकृष्ण कॉलनी परिसर, पावर ग्रिड कॉलनी परिसर, लक्ष्मी नगर, भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.
चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु, वेलकम कॉलनी परिसर भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील कूसराळा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
कोरपना तालुक्यातील सोनुरली गडचांदूर, आवारपूर, आंबेडकर भवन, माणिक गड कॉलनी परिसर, भागातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील पिक्चर कॉलनी परिसर, सास्ती, भारत चौक, अमराई वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही, नवरगाव, लाडबोरी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील मंगरूळ, गिरगाव परिसरातून बाधित पुढे आले आहे.