चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 12522 बाधित कोरोनामुक्त

चंद्रपूरदि. 30 ऑक्टोबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे चार मृत्यू झाले असून 197 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 15 हजार 635 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 175 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 12 हजार 522 झाली आहे. सध्या 2 हजार 882 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 19 हजार 520 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 1 लाख 2 हजार 332  नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील 55 वर्षीय महिला व आरमोरी येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील 77 वर्षीय महिलामुल येथील 80 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 231 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 216तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली सहायवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 113 पुरूष व 84 महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 58पोंभुर्णा तालुक्यातील एकबल्लारपूर तालुक्यातील 9, चिमुर तालुक्यातील 9,  मुल तालुक्यातील 13गोंडपिपरी तालुक्यातील सातजिवती तालुक्यातील दोनकोरपना तालुक्यातील 14ब्रह्मपुरी तालुक्यातील 18नागभीड तालुक्यातील सात,  वरोरा तालुक्यातील 18भद्रावती तालुक्यातील 13सावली तालुक्यातील पाचसिंदेवाही तालुक्यातील 12राजुरा तालुक्यातील तीनगडचिरोली सात तर वणी-यवतमाळ येथील एक असे एकूण 197 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

बालाजी वार्डघुटकाळा वार्डभिवापुर वॉर्डनगीना बागपत्रकार नगररामनगरराणी लक्ष्मी वार्डकृष्णा नगरजल नगर वार्डइंदिरानगररहमत नगरआंबेडकर नगर बाबुपेठसाईनगरहॉस्पिटल वार्डसमाधी वार्डबंगाली कॅम्प परिसरतुकूम भागातून बाधित ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

वरोरा तालुक्यातील यात्रा वार्डविनायक लेआउटआनंदवनहनुमान वार्डगांधी वार्डमित्र चौक परिसरइंदिरानगरराम मंदिर वार्डदत्त मंदिर वार्ड परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील  विद्यानगरअर्जुनी मोरगावचिचखेडाबोंडेगावकोरंबी टोलाबालाजी वार्डशांतीनगर परिसरातून बाधित ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील मंजुषा लेआउटजुना सुमठाणाघोडपेठझाडे प्लॉट परिसरसुरक्षा नगरकटारिया लेआउटअहिल्यादेवी नगर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील चुनाळाहनुमान मंदिर सास्ती भागातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाहीनवरगावरत्नापूरलाडबोरी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील शिवाजी चौक,कोरधा भागातून बाधित पुढे आले आहे.

कोरपना तालुक्यातील  माणिक गड कॉलनी परिसरगांधी चौकनांदा फाटानोकारीगडचांदुरकैलाश नगर मांगोलीपावडे लेआउटविद्यानगरशिवनगर वार्ड भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर 11मारोडागडीसुर्ला परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील  विसापूर,राणी बाई वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

चिमूर तालुक्यातील पिंपळनेरीगांधी वार्डआझाद वार्डआबादी वार्डकिटाळीशिरपूरशंकरपुर भागातून बाधित ठरले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधीसुखवासीधाबा परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.सावली तालुक्यातील चक पिरंजीविहिरगाव भागातून बाधित ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here