उभ्याने ढोकसणाऱ्यांसाठी दोन-तिन महिण्यात येईल खुशखबर ?
दारूबंदी उठविण्या संबंधात विचारलेल्या प्रश्नाला पालकमंत्र्याची “मिश्कील” गुगली !
चंद्रपूर : गुरुवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी चंद्रपूरचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी चंद्रपूरात दारूबंदी कधी उठणार ? यावर प्रश्न विचारला असता पालकमंत्र्यांनी ‘लवकरचं’ असे उत्तर देत दारूबंदी उठविण्याची फार घाई दिसते, अशी मिश्किलपणे गुगली टाकली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठणार या चर्चेला पेव फुटला, पालकमंत्र्यांनी तशी वाच्यता केली होती. सध्या दारूबंदी उठणार की कायम राहणार ? यावर गल्लीबोळात चर्चा होऊ लागली आहे. दारूबंदीचा विषय सर्वसामान्यांसाठी “विशेष” बाब ठरताना दिसत आहे. उभ्याने ढोकसणाऱ्यांसाठी व तशी सवय जडलेल्यांना “मद्या”चा प्याला सध्यातरी “टेबल” वर मिळण्याची शक्यता कमी आहे. परंतू उभ्याने ढोकसणाऱ्यांसाठी दोन-तिन महिण्यात ही खुशखबर येईल, अशी शक्यता नाकारता येत नाही. यावेळी पालकमंत्र्यांनी लवकरच दारूबंदी उठविण्यासंबंधातील मंत्र्यांची समिती गठीत करण्यात येणार असून त्यानंतर या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल व त्याला दोन- तीन महिन्याचा कालावधी तरी लागेल असे सूतोवाच विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केले.