समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट, कारवाई करण्याची मागणी
चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या समीर केने या माथेफिरूने समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली. माथेफिरू समीर केने याला अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी (ता. ४) गांधी चौकात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. केनेला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली. परंतु, गांधीजींचे विचार ही प्रवृत्ती संपवू शकली नाही. नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या समीर केने या माथेफिरूने समाजमाध्यमात गांधीजींची तुलना आसाराम बापूशी करीत आक्षेपार्ह विधान केले होते. या घटनेचे पडसाद उमटले. शनिवारी (ता. ३) चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांनी माथेफिरू समीर केनेविरोधात अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. बहादुरे यांच्याकडे तक्रार दाखल करून अटकेची मागणी केली. शहर राष्ट्रवादी काँग्रेसनेही दुर्गापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रविवारी (ता.४) माथेफिरू समीर केने याच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसने गांधी चौकात आंदोलन केले. शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी, अल्पसंख्याक विभाग प्रदेश महासचिव मलक शाकीर, महाराष्ट्र अनुसूचित जाती उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, उमाकांत धांडे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सुनीता अग्रवाल, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रझा, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष अनुताई दहेगावकर, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष संजय रत्नपारखी, एनएसयूआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, नगरसेविका संगीता भोयर, माजी नगरसेवक प्रवीण पाडवेकर, मंगेश डांगे, एनएसयूआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन कत्याल, युवा काँग्रेस प्रदेश सचिव रुचित दवे, एनएसयूआय जिल्हाअध्यक्ष यश दत्तात्रेय , युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष नौशाद शेख, माजी नगरसेवक राजू रेवल्लीवार, माजी नगरसेवक प्रसन्ना सिरवार, माजी नगरसेवक पिंकी दीक्षित, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, माजी नगरसेवक पितांबर कश्यप , माजी नगरसेविका एकता गुरुले, विजय धोबे, पप्पू सिद्दीकी, अभिषेक तिवारी, केतन दुरसेल्वार,रुपेश वासेकर, शिवम तिवारी, बिट्टू जंगम, सुल्तान भाई, भानेश जंगम, वैभव येरगुडे यांचा आंदोलनात सहभाग होता.