24 तासात 159 बाधितांची नोंद

चंद्रपूर,4 ऑक्टोबर :
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 4 ऑक्टोबर रोजी 11026 झाली आहे. गेल्या 24 तासात 159 नवीन बाधित पुढे आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत 7558 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 3301 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 7558 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 158 सह एकूण 167 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान ही वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे , सुरक्षा बाळगावी आणि आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here