चंद्रपूर शहरातील 126 सह 232 बाधितांची वाढ

चंद्रपूर, दि. 27 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 232 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 9 हजार 582 झाली आहे. यापैकी 5 हजार 511 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 928 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासामध्ये एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये रामपुर, राजुरा येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा  समावेश आहे. या बाधिताला 21 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 143 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 135, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन आणि यवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 126 बाधित, बल्लारपूर तालुक्यातील 12, चिमूर तालुक्यातील तीन, मुल तालुक्यातील 8, गोंडपिपरी तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील 9, ब्रह्मपुरी तालुक्यातील 12, नागभीड तालुक्यातील 14, वरोरा तालुक्यातील पाच, भद्रावती तालुक्यातील एक, सावली तालुक्यातील 12,  राजुरा तालुक्यातील 19, यवतमाळ जिल्ह्यातील तीन, गडचिरोली जिल्ह्यातील पाच, वर्धा व तेलंगणा येथील प्रत्येकी एक असे एकूण 232 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपुर शहर व परिसरातील वृंदावन नगर, जिल्हा कारागृह, नगीनाबाग, वडगांव, विठ्ठल मंदिर वार्ड, दत्त नगर, संजय नगर, जलनगर, बाबुपेठ, रामनगर, जटपुरा गेट, चोर खिडकी, पठाणपुरा वार्ड, तुकुम, अंचलेश्वर वार्ड, लालपेठ कॉलनी, आकाशवाणी रोड परीसर, भानापेठ, बंगाली कॅम्प, बापट नगर, इंदिरा नगर, नेहरु नगर, पंचशिल चौक, जीएमसी चौक, क्रिष्णा नगर, बालाजी वार्ड, नांदा फाटा, सरकार नगर, बालाजी वार्ड, घुग्घुस, उर्जानगर, दुर्गापुर या परीसरातुन बाधित पॉझिटीव्ह ठरले आहे.
तालुक्यात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील डॉ.राजेंद्र प्रसाद वार्ड, गोकुळ वार्ड, गांधी वार्ड, टिळक वार्ड, फुलसिंग नाईक वार्ड, विद्यानगर वार्ड या भागातून बाधित पुढे आले आहेत. चिमूर तालुक्यातील शंकरपुर या परिसरातून बाधित पॉझिटिव्ह ठरले आहे.
मुल तालुक्यातील चिरोली गावातून बाधित ठरले आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील इंदिरानगर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.
कोरपना तालुक्यातील उपरवाही परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील देलणवाडी, कोलारी, नंन्होरी, विद्यानगर, नागेश्वर नगर, गांधी नगर, विद्या नगर, रानबोथली भागातून बाधित पुढे आले आहे.
नागभीड तालुक्यातील मिंढाळा, नवखाळा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील माजरी भागातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील लोणारा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
राजुरा तालुक्यातील रमाबाई नगर, सोमनाथपूर वार्ड, देशपांडे वाडी परिसर, जुना बस स्टॉप परिसर, सास्ती, रामनगर, जवाहर नगर, स्वप्नपूर्ती नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here