गुरुवारी आणखी सहा बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 24 सप्टेंबर : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 210 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 8 हजार 709 वर गेली आहे. आतापर्यंत 5 हजार 51 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 528 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, घुटकाळा वार्ड, चंद्रपूर येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू आनंदवन परीसर, वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू तुकूम, चंद्रपुर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू आंबेडकर कॉलेज परिसर, चंद्रपूर येथील 60 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 20  सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

पाचवा मृत्यू एकोरी वार्ड, चंद्रपूर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 18 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर,सहावा मृत्यू चिमढा,मुल येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 20 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. अनुक्रमे एक ते दोन मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.तर, तीन ते सहा मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 130 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 123, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन आणि यवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 80 बाधित, पोंभूर्णा तालुक्यातील 1, बल्लारपूर तालुक्यातील 33, चिमूर तालुक्यातील 13,मूल तालुक्यातील 11, गोंडपिपरी तालुक्यातील 5, कोरपना तालुक्यातील 4, ब्रह्मपुरी तालुक्यातील 4, नागभीड तालुक्यातील 21,  वरोरा तालुक्यातील 14,भद्रावती तालुक्यातील 11, सावली तालुक्यातील 1,  सिंदेवाही तालुक्यातील 2, राजुरा तालुक्यातील 10 असे एकूण 210 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परीसरातील इंदिरानगर, रयतवारी कॉलनी परिसर, बाबुपेठ, तूकूम, नगीनाबाग, समाधी वार्ड, सुमित्रा नगर, घुग्घुस, हनुमान नगर, ऊर्जानगर, श्याम नगर, शक्तिनगर दुर्गापुर, भावसार चौक परिसर, बालाजी वार्ड, वडगाव, गणेश नगर, नेहरूनगर, विठ्ठल मंदिर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

तालुक्यातील या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील बुद्ध नगर वार्ड, गोकुळ नगर, कन्नमवार वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, गणपती वार्ड, झाकीर हुसेन वार्ड, डब्ल्यूसीएल कॉलनी परिसर, विवेकानंद वार्ड, वैशाली चौक परिसर, टिळक वार्ड, गौरक्षण वार्ड, विद्यानगर, श्रीराम वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु, जांभुळघाट, सोनेगाव, पिंपळनेरी, गांधी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

मुल तालुक्यातील चिमढा, वार्ड नंबर 4 परिसरातून बाधीत ठरले आहे. राजुरा तालुक्यातील दोगेवाडी, सोमनाथपूर वार्ड, विवेकानंद नगर, सास्ती कॉलनी परिसर, रामनगर,भागातून बाधीत पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील निमसडा, दहेगाव, सरदार पटेल वार्ड, हनुमान वार्ड, आझाद वार्ड, सर्वोदय नगर, टिळक वार्ड, अभ्यंकर वार्ड, विद्यानगरी, सुभाष वार्ड, परिसरातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील भगतसिंग चौक परिसर, वलनी मेंढा, विठ्ठल मंदिर चौक परिसर, बाजार वार्ड, बाळापुर, डोंगरगाव, प्रगती नगर, मिंथूर, तळोधी, नवेगाव पांडव भागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलपटली, पेठ वार्ड, गुजारी वार्ड, परिसरातून बाधित ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील एसीडब्ल्यू कॉलनी परिसर,  वार्ड नंबर 5, शांती कॉलनी नांदा फाटा भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील गौतम नगर, विजासन रोड परिसर, विश्वकर्मा नगर, साईनगर, एकता नगर, आंबेडकर वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील काचेपार, नवरगाव भागातून बाधित ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here