नवी दिल्ली : भारत देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग
आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी समूह राष्ट्रगीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलन झाले.
या कार्यक्रमास चंद्रपूर जिल्हयाचे खासदार सुरेश धानोरकर,महाराष्ट्र सदनाच्या गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार,महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र सदनात निवासास असणारे अतिथी तसेच दिल्ली स्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
राजधानीतील लाल किल्ल्यावर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व त्यांनी देशवाशियांना संबोधित केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.