चंद्रपूर: मंगळवार 5 एप्रिल रोजी नांदेडचे प्रख्यात बांधकाम व्यवसायी व समाजसेवक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या राहत्या घरासमोर भरदिवसा गोळीबार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा चंद्रपूर माहेश्वरी समाज, चंद्रपूर सिंधी समाज, चंद्रपूर व्यापारी मंडल तर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
आज गुरुवार 7 एप्रिलला चंद्रपूर माहेश्वरी समाजातर्फे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलिस महासंचालक यांना निवेदन देण्यात आले. नांदेड येथील श्री.संजय बियाणी यांच्यावर भरदिवसा त्यांच्या घरासमोर झालेल्या क्रूरतापूर्वक हत्येच्या तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर माहेश्वरी समाजाने केली आहे.
चंद्रपूर जिला माहेश्वरी संगठनचे अध्यक्ष डॉ सुशील मुंधडा यावेळी म्हणाले की, माहेश्वरी समाज हा शांतीप्रिय समाज असून समाजकार्य व देशहितात सदैव पुढे असतो. आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो हीच भावना आपल्या मनात बाळगून समाजकार्यात आपले तन- मन- धन लावून सतत कार्यरत असतो. स्व.संजय बियाणी सुद्धा एक उत्कृष्ट समाजसेवक होते. बियाणी यांची हत्या खंडणीसाठी केली असल्याचा संशय माहेश्वरी समाजाने व्यक्त केला आहे. हा हल्ला फक्त स्व.संजय बियाणी यांच्यावर झाला नसून संपूर्ण माहेश्वरी समाज सोबतच देशाच्या प्रत्येक व्यावसायिकावर व प्रत्येक समाजसेवकावर झाल्याची भावना मुंधडा यांनी व्यक्त केली.
स्व.संजय बियाणी यांच्या कुटुंबीयांना लवकर न्याय मिळाले नाही तर भारतीय संविधानाच्या सर्व नियमांचे व भारतीय कायद्यांचे पालन करून माहेश्वरी समाजा तर्फे जनआंदोलन पुकारण्यात येईल अशी चेतावनी सुद्धा देण्यात आली.
यावेळी चंद्रपूर जिल्हा माहेश्वरी संगठनचे अध्यक्ष डॉ. सुशील मुंधडा, सरचिटणीस शिवनारायण सारडा, चंद्रपूर जिल्हा माहेश्वरी महिला संगठनच्या अध्यक्षा सौ.दुर्गा सारडा, सरचिटणीस राधिका मुंधडा, माहेश्वरी सेवा समितिचे सचिव सुरेश राठी, माहेश्वरी युवक मंडलचे अध्यक्ष मनीष बजाज, पंकज सारडा, चंद्रपूर व्यापारी मंडलचे अध्यक्ष रामजीवन परमार,सचिव प्रभाकर मंत्री,राजू पंजाबी,सुमेध कोतपल्लीवार,गिरीश चांडक, गोपाल मुंधडा, चंद्रकांत बजाज, दिनेश बजाज, दामोदर मंत्री, जुगल सोमाणी, मुकुंद गांधी, रमेश मुंधडा, सुनीता सोमाणी, सिंधी समाजाचे अध्यक्ष तहलीयाणी सचिव अशोक हसानी, माहेश्वरी महिला मंडलच्या अध्यक्षा इंदु जाजू, सुनीता सोमाणी, दीपक सोमाणी, ललित कासट,विनोद सोनी,गोविंद तेला,विजय करवा,ऋषिकांत जाखोटीया,नितिन जाजू,गौरव लाहोटी,आशिष तोष्णीवाल,अर्जुन राठी,चंद्रपुर जिला माहेश्वरी युवा संगठनेचे अध्यक्ष आश्विन सारडा, सचिव पियूष माहेश्वरी व माहेश्वरी समाजाचे इतर सदस्य उपस्थित होते.