चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात बनणार १३ ग्रीन जिम
चंद्रपूर:आमदार किशोर जोरगेवार यांच्या विशेष प्रयत्नातून विधानसभा क्षेत्रात जिल्हा वार्षीक निधी अंतर्गत 13 ग्रिन जिम मंजूर करण्यात आल्या असून ९१ लक्ष रुपयातून या १३ ग्रिन जिम तयार केल्या जाणार आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. त्यांच्या प्रयत्नांना आता यश प्राप्त होत आहे. नुकतेच १ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे त्यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या सततच्या पाठपूराव्या नंतर मतदार संघातील 13 ग्रीन जिमला जिल्हा वार्षीक निधी अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.
ग्रिनजिमसाठी 91 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असुन यात चंद्रपूर येथील डाॅ. महाकुलकर ले आउट, दादमहल हनुमान खिडकी, भंगाराम मंदिर भिवापूर, बंगाली कॅम्प, इंडस्ट्रीयल प्रभाग, नगीनाबाग, दाताळा, कोसारा येथे सदर ग्रीन जिम तयार करण्यात येणार आहे. ग्रिन जिम बांधण्यात यावी अशी अनेक ठिकाणाहून मागणी आली होती. त्यामुळे या ग्रिनजिमसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने पाठपूरावा सुरु केला होता. आता सदर ग्रीन जिम मंजुर झाल्या आहे. साकार होणा-या या ग्रिन जिममुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असुन याचा स्थानिक नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे.