24 तासात 6 नव्याने पॉझिटिव्ह,13 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि.1: जिल्ह्यात मागील 24 तासात 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सहा कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 80 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 567 झाली आहे. सध्या 121 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख 586 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 75 हजार 704 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 392 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 354, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या सहा रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील एक, चंद्रपुर तालुक्यातील एक, बल्लारपुर एक, ब्रम्हपुरी दोन व येथील चिमूर एका रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here