चंद्रपूर: पुणे येथे आयोजित शांतीदुत महाकरंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेत आम्ही चंद्रपूरकर या संस्थेने सादर केलेल्या योगेश सोमण लिखित, डॉ. जयश्री कापसे-गावंडे दिग्दर्शीत ‘दृष्टी‘ या एकांकीकेतील प्रमुख भूमीकेसाठी कु.बकूळ धवने हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रथम पुरस्कार संपादन केला आहे. दिनांक ३१ जानेवारी रोजी पुण्याचे महापौर मुर्लीधर मोहोळ, माजी विशेष पोलिस महानिरिक्षक विठ्ठल जाधव, सिनेअभिनेत्री माधवी मोरे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत बकूळने हा पुरस्कार स्विकारला.
दृष्टी या एकांकीकेत बकूळने अंध तरुणीची भूमीका साकारली असून हिमांशू जोशी हे या एकांकीकेत तिचे सहकारी कलावंत आहे. एकांकीकेची प्रकाशयोजना हेमंत गुहे यांनी केली असुन संगीत नियोजन सुशिल सहारे यांचे आहे. नेपथ्य तेजराज चिकटवार आणि पंकज नवघरे यांचे असून रंगभूषा आणि वेशभूषा नूतन धवने यांची आहे. या नाटकाचे निर्माते आशिष अंबाडे आहे. बकूळ धवने हिच्या या यशाबद्दल येथील सांस्कृतीक वर्तुळात तिचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.