सर्वसामान्य जनतेला मोदी है तो मुमकीन है हा विश्वास देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प : आ. सुधीर मुनगंटीवार
कोरोना मुळे उदभवलेल्या संकटावर मात करत त्यातून संधी शोधत भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा संकल्प करत त्या संकल्प पूर्तीसाठी पावले उचलणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प आज केंद्रीय वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची आत्मनिर्भर भारत ही संकल्पना सार्थ ठरविणारा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला मोदी है तो मुमकीन है हा विश्वास देणारा असल्याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
जानेवारी २०२१, मध्ये १.२० लाख कोटी रुपये आजपर्यंत चा रेकॉर्ड ब्रेक जीएसटी कलेक्शन झालं आहे. GST लागू झाल्यानंतर आजपर्यंतचा हा सर्वाधिक कलेक्शन आकडा आहे. जे लोक म्हणतात, लॉक डॉउन मध्ये छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडलेत, नौकऱ्या गेल्यात त्यांच्यासाठी मोठी चपराक आहे. या काळात नौकरी टिकवणं खूप अवघड झालं होतं, अश्यातच संकटातून संधीही निर्माण झालेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने MSME ला प्रोत्साहन देत देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी मोठं योगदान दिले आहे. विशेषतः महाराष्ट्रात सर्वाधिक MSME ने मोठ्या प्रमाणात कर्ज तरुणांना दिले आहे . उद्योग , कृषी , पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रांसाठी भरीव आर्थिक तरतूद करत महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सुद्धा ठोस पावले या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उचलली गेली आहे. नागपूर व नाशिक येथील मेट्रोसाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. पुन्हा या देशाला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प करत त्या दृष्टीने केलेले संकल्प आश्वासक व तमाम देशवासियांना दिलासा देणारे असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. या सर्वस्पर्शी अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी , वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे आ. मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकाचा लॉलीपॉप : खासदार बाळू धानोरकर
चंद्रपूर : आज मोदी सरकारने अर्थसंकल्पात केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू राज्यातील निवडणूका डोळ्यासमोर ठेवून यांना अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचा लॉलीपॉप दिला आहे. असे मत खासदार बाळू धानोरकर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिकिया देताना म्हंटले आहे.
इतर राज्याच्या तुलनेत या चारही राज्यासाठी 2.27 लाख करोडच्या पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याच्या तुलनेत महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहे. देशाला अन्नसुरक्षा देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भरीव काही तरतूद करण्यात आली नाही. कोरोनामुळे देशात हजारो रोजगार गेले, रोजगार निर्मितीसाठी या बजेटमध्ये खास काही नाही.
माध्यम वर्गीयांसाठी आयकरात सूट अपेक्षित होती ती फोल ठरली. त्यामध्ये काही दिलासा दिलेला नाही. एअर इंडीया, एल. आय. सी. ला विकण्याचा निर्णय ह्या मोदी सरकारने केला आहे. सरकारी जमीनी विकणार, बीपीसीएल पण सरकार विकणार असून हे सरकार सरकारी मालमत्ता विकणारे मोदी सरकार ठरणार आहे.
आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी आणि शेती या घटकाला अर्थसंकल्पात केंद्र स्थानी ठेवण्यात आलेले नाही. महिला सबलीकरण याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या अर्थसंकपात सामान्य माणसावर अन्याय करण्यात आला आहे. अच्छे दिन च्या लॉलीपॉप देऊन हे मोदी सरकार दोनदा केंद्रात सत्ता स्थापन केली आहे. आधीच पेट्रोल आणि इतर इंधनाचे दर मात्र १०० पार करत आहे. त्यात या बजेटमध्ये डिझेलवर ४ रु व पेट्रोलवर २.५० रु कृषीकर लावण्यात आला आहे. जीएसटी मधील कमतरता दूर करण्याचे केवळ आस्वासन दिल्या जात आहे. त्यामुळे देशातील व्यापारी वर्ग मोदी सरकारवर तीव्र नाराज आहे. मोबाईल चार्जर सारख्या ज्या चैनीच्या नव्हे तर प्रत्येकाच्या गरजेच्या वस्तू आहे. त्या सुद्धा महागवल्या आहे. या सर्व कारणामुळे आता मात्र या देशाच्या शेवटच्या माणूस व शेतकरी या मोदी सरकारला आपली जागा नक्की दाखवेल. अशी प्रतिक्रिया खासदार बाळू धानोरकर यांनी दिली आहे.