चंद्रपूर:अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ या नोंदणीकृत संस्थेच्या नागपूर विभागीय कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व प्रसिद्धी देण्यासाठी असून या मंडळाद्वारे आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले.
राज्याध्यक्ष नटराज मोरे व राज्य कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विभाग अध्यक्ष किशोर चलाख यांनी सदर कार्यकारीणीची निवड केली.यामध्ये चंद्रकांत दडमल, जयश्री सातोकर यांची उपाध्यक्ष पदी तर सचिव म्हणून किशोरकुमार बन्सोड यांची निवड झाली.कार्याध्यक्षपदी संतोष मेश्राम व सहसचिव पदी दिनेश राठोड यांची निवड झाली.नंदकिशोर मसराम यांची कोषाध्यक्ष पदी तर परीक्षण समिती प्रमुख म्हणून अशोक बोरकुटे यांची निवड झाली.सुनील हटवार यांची तंत्रज्ञान प्रमुख म्हणून तर तंत्रनिर्देशक पदी सतीश दुवावार यांची निवड करण्यात आली.कलावती कोल्हटकर यांची स्पर्धागट प्रमुख म्हणून निवड झाली.विभागीय कार्यकारीणी सदस्य म्हणून प्रदीप भुरसे, नागेंद्र नेवारे,वसंत गोमासे, गंगाधर येवले, धनंजय मुडे, मुरलीधर खोटेले यांची निवड करण्यात आली.सदर निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.