बुलेटवरून फटफट कराल तर बसतील पोलिसांचे फटके!

वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूरची कर्कश सायलेन्सर विरुद्ध मोहीम

चंद्रपूर: शहरात बुलेट मोटार सायकल स्वार हे सायलेन्सर मध्ये फेरबदल करून त्याऐवजी कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून स्टंटबाजी करीत असल्याचे तसेच गर्दीचे ठिकाणी सायलेन्सरचे कर्णकर्कश आवाज काढीत असल्याचे निदर्शनास आले तसेच जेष्ठ नागरीकांकडून याबाबत वारंवार तक्रारी येत असल्यामुळे वाहतूक नियंत्रणा शाखा चंद्रपूर तर्फे अशा बुलेटस्वारांवर कारवाई करण्याकरीता पथक तयार करून विशेष मोहीम दरम्यान माहे जानेवारी 2023 ते माहे मे 2023 या कालावधीत कर्णकर्कश आवाज व सायलेन्सरमध्ये फेरबदल करणाऱ्या अशा एकूण 80 बुलेटस्वारावर कलम 198 व 194 (एफ) मोटार वाहन कायदा अन्वये दंडात्मक कारवाई करुन सायलेन्सर जप्त करण्यात आले.

सदरची मोहीम पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री रोशन यादव, आणि पोलीस निरीक्षक श्री प्रविणकुमार पाटील यांचे नेतृत्वात वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांनी राबविली. तसेच यापुढे सुध्दा ही मोहीत सतत राबविण्यात येणार असल्याने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या वाहनातील सायलेन्सर मध्ये कोणतेही फेरबदल किंवा कर्णकर्कश सायलेन्सर लावू नये अन्यथा त्यांच्या परिणामकारक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत चंद्रपूर पोलीस दलातर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here