चंद्रपूर: शुक्रवार 12 ऑगस्ट 2022 ला चंद्रपुरात स्थानिक वाहतूक नियंत्रण कार्यालय मध्ये रक्षाबंधनचा कार्याक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी 9 वाजता घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला वाहतूक निरीक्षक श्री.प्रवीण पाटिल तसेच विश्व हिन्दू परिषदचे जिल्हा अध्यक्ष श्री.रोडमल गहलोत, महानगर उपाध्यक्ष श्री. विजय येंगलवार मातृशक्ति सह संयोजिका सौ. मेघाताई चांदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. वाहतूक कार्यालयातील सर्व अधिकारी पासून तर शिपाही पर्यंत सर्वांना राखी बांधण्यात आली.
यावेळी बजरंग दल जिल्हा संयोजक. श्री अमित करपे, तसेच सौ.क्षमाताई महाकाळे, अनिता कासरलेवार, नंदा बुरडकर, नेहा दीक्षित, केतकी देशपांडे आदी सर्व महिला शक्ती यांची उपस्थिती होती.