चंद्रपूर:मागील चार -पाच दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. इरई धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने बुधवारी सकाळी इरई धरणाचे सातही दरवाजे एक मीटरने उचलून प्रतिसेकंद 517 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
हे रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
• वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे आर्वी ते राजुरा मार्ग बंद झालेला आहे. पुलावरून 2 फूट पाणी वाहत आहे.
• बल्लारपूर तालुक्यातील मोजा माना ते चारवट हडस्ती मार्ग ईरइ नदीला आलेल्या पुरामुळे आज सकाळ पासून बंद झाला.
• तोहगाव ते लाठी दरम्यान वेजगांव नाल्याला आलेल्या पुरामुळे मार्ग बंद आहे.
• सोईत वर्धा नदी वरून पण्याची पातळी वाहाल्या मुळे पुलावरून पाणी वाहत असून सकाळी आज वाहतूक बंद झाली आहे.