उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत

नागपूर दि. ५ : राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोच्या संख्येने जमलेल्या नागपूरकर जनतेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले.  विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून शहरात विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.

मुंबई येथून आज सकाळी ते विमानाने नागपूरला 11 वाजता पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस होत्या. नागपूर विमानतळावर त्यांचे विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी.,विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व अन्य अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here