कविसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा
चंद्रपूर :चंद्रपूरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री प्रा. विमल गाडेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (ता. २६) ‘विमल दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता कार्यक्रम संपन्न होईल. अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक व संपादक सुरेश द्वादशीवार तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, समीक्षक डॉ. प्रतिभा वाघमारे उपस्थित राहतील.
यावेळी श्याम पेठकर संपादित प्रा. विमल गाडेकर लिखीत अप्रकाशित साहित्याचे ‘कोळवेकंच’ या पुस्तकाचे तसेच अविनाश पोईनकर व वर्षा पोईनकर संपादित प्रा. विमल गाडेकर : व्यक्ती आणि वाङ्मय’ या ग्रंथाचे प्रकाशन होईल. तसेच विमल गाडेकर लिखीत ‘चंदनी दरवळ’ या रमाईवरील खंडकाव्याचे साभिनय सादरीकरण अॅड चैताली बोरकुटे कटलावार व सुशील सहारे करतील.
दुस-या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन अमरावतीचे प्रसिद्ध कवी बबन सराडकर यांच्या अध्यक्षतेखाली व कवयित्री शोभा रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. यात उषाकिरण आत्राम, पद्मरेखा धनकर, श्रीपाद जोशी, किशोर कवठे, मनोज बोबडे, रेवानंद मेश्राम सहभागी होतील. सुत्रसंचालन कवी पुनीत मातकर करतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन इंजि. भगवान गाडेकर, डॉ. हेमंत व सविता गाडेकर, जयंत व सोनामोनी गाडेकर, अर्चना व प्रकाश शंभरकर, डॉ. मोना व पंकज तसेच प्रा. विमल गाडेकर स्मृती सोहळा समितीने केले आहे.