चंद्रपूर : विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश महासचिव कुणाल चहारे, पठाणपुरा व्यायामशाळा यांच्या पुढाकारातून पालकमंत्री चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्हाभरातील ७८ कबड्डी संघांनी सहभाग नोंदविला होता. साईबाबा क्रीडा मंडळाने पालकमंत्री चषक पटकाविला. तर, पठाणपुरा व्यायामशाळेचा संघ उपविजेता ठरला आहे. स्पर्धेच्या ठिकाणी जनजागृतीपर लावण्यात आलेले पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.(व्यसनमुक्ति,स्त्री शक्ति, नारी सम्मान,पर्यावरण जनजागृति, शिक्षणविषयी जागृति, सामाजिक एकता विषयी जागृति.)
या स्पर्धेचे उद्घाटन युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानीताई विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झाले.यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, महिला काँगेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे, माजी महापौर संगीता अमृतकर, नगरसेविका सुनीता लोढिया, अश्विनी खोब्रागडे, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रता ठेमस्कर यांची उपस्थिती होती.
स्पर्धेचा समारोप पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, कामगार नेते के. के. सिंग, विनायक बांगडे, श्रीकांत चहारे, राजेश अडूर, विजय चहारे, रुचित दवे, पप्पू सिद्दीकी, भालचंद्र दानव, युसूफ चाचा, संजय गंपावार,नौशाद शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यायामशाळेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुलीच्या गटात विठ्ठल मंदिर व्यायाम शाळेचा संघ विजेता, तर पठाणपुरा व्यायामशाळेचा संघ उपविजेता ठरला. ६० किलो वजनगटात महाकाली क्रीडा मंडळ विजेता, तर पठाणपुरा व्यायामशाळेने उपविजेतेपद पटकाविले. यावेळी तब्बल २१ आकर्षक बक्षीसे देण्यात आली.