मनपा आयुक्तांवर शाई फेकल्याप्रकरणी चंद्रपूर मनपातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला निषेध

चंद्रपूर : अमरावती येथील मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर तीन महिलांनी शाई फेकल्या प्रकरणी या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवार, दिनांक 10 फेब्रुवारी रोजी काळ्या फीती लावून काम केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या युनियनने एकत्रित येत या घटनेचा निषेध केला आणि गुरुवारी दिवसभर फिती लावून कामकाज केले. शाही फेकणाऱ्या आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी शासनाला पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांना देण्यात आले.

९ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १.१५ च्या दरम्यान अमरावती येथील राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर गेले होते. तेथे काही महिलांनी आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांच्या अंगावर शाई टाकुन त्यांना धक्काबुक्की केली तसेच त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही नक्कीच अत्यंत चिंताजनक बाब असून, भारतीय नगर परिषद कामगार संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने या गुन्हेगारी कृत्याचा १०/०२/२०२२ रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन शीघ्र गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत, अशी मागणी भारतीय नगर परिषद कामगार संघाचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here