गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार
राजुरा:२६ जानेवारी २०२२ ला प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी सरपंच माननीय श्री आबाजी पाटील ढुमणे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या राजुरा तालुक्यातील सिंधी येथील वाचनालयाला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या श्री. बुजोने सर, श्री. चव्हान सर, श्री. खोब्रागडे सर, सौ. चापले मॅडम, माकोडे मॅडम या सर्व शिक्षकांनी श्री.आबाजी पाटील ढुमणे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षेच्या पुर्व तयारी करीता आपल्या स्तरावरुन ४०००/- रू किमतीची पुस्तके भेट दिलीत. अभ्यासिकेतील विद्यार्थी संघर्ष झुरमुरे, निखिल मत्ते, उत्कर्ष ढुमणे, कुणाल मोरे, ओम रायपल्ले, शिव ढुमणे, संघर्ष दरेकर, प्रज्योत दरेकर व इतर यांनी ४०००/-रु किंमतीच्या पुस्तकांचा स्वीकार केला. तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी गावकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.यापूर्वी गावातील विद्यार्थ्यांनी एनएमएमएस, नवोदय तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळविले आहे.त्याला अधिक चालना मिळावी या हेतूने निर्माण झालेल्या श्री.आबाजी पाटील ढुमणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभ्यासिका या उपक्रमाची गावातून विशेष प्रशंसा होत आहे.
या अभिनव उपक्रमा प्रसंगी सरपंच शौभाताई रायपल्ले, उपसरपंच रामभाऊ ढुमणे, पोलीस पाटील सुनीताताई धानोरकर सदस्य किशोर कोडापे सदस्या उज्वला दामेलवार, सोमबाई सिडाम, मधुकर पाटील धानोरकर, भास्कर मोरे, मंगेश रायपल्ले,राजु दामेलवार, विनोद ढुमणे, पियुष झुरमुरे, गुणवंत मोरे आणी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.