चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून उषाताई बुक्कावार यांची निवड 

चंद्रपूर, दिनांक १३ : चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या उषाताई बुक्कावार यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे.

चंद्रपुरातील उषाताई बुक्कावार या बहुआयामी व्यक्तिमत्व असून, विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सेवा केली आहे. त्यांना बागकामाची आवड आहे. १९९२ पासून त्या बागकामाचे प्रशिक्षण घेतात. २००२ मध्ये त्यांनी महिला संस्कार कलशची स्थापना केली. यात 400 भगिनीचा सहभाग असून, गरजुंना मदत केली जाते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध सामाजिक संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विविध विकासकामे, योजना आणि संकल्पनाची माहिती जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून उषाताई बुक्कावार यांची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here