चंद्रपुरातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज सुरु करण्यास प्रशासनाची परवानगी

चंद्रपूर दि. 21 ऑक्टोंबर:  शासनाच्या आदेशान्वये ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज, मार्गदर्शक सूचनांचे तसेच अटी व शर्तींचे पालन करण्याच्या अधिन राहून दि. 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी जारी केले आहे.
या आदेशानुसार जिल्ह्यातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज दि. 22 ऑक्टोंबर 2021 पासुन सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. या आदेशाद्वारे फक्त मोकळया जागेतील कोरडया राईड्ससाठी परवानगी देण्यात येत असून यामध्ये पाण्यातील राईड्ससाठी सक्त मनाई आहे.
या  आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 22 ऑक्टोबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या आदेशात नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here