शुक्रवार पासून बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यास प्रशासनाची मान्यता

चंद्रपूर दि. 20 ऑक्टोबर: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणा-या इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना कोरोना वर्तणूक विषयक नियमांचे पालन करून तसेच मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.नुकतेच यासंबंधीचे आदेश  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.
सर्व संबंधितांनी सभागृहे तसेच मोकळ्या जागेत होणारे इतर कार्यक्रमांचे परिचालन, कोविड-19 संदर्भातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधाचा भंग होणार नाही अशा पद्धतीने करणे आवश्यक आहे. त्यासोबतच कोरोना विषयक मार्गदर्शक तत्त्वांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच कोविड-19 विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून व कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सूचना या प्रकरणीही लागू राहतील.
या  आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास सबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि.22 ऑक्टोबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here