गेल्या 25 दिवसात 2 हजार 573 ग्राहकांची बत्ती गुल
चंद्रपूर:महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदार ग्राहकांविरोधात वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई सुरू असून गेल्या 25 दिवसात 2 हजार 573 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. अनेक ग्राहकांनी आॅक्टोबर 2020 पासून आॅक्टोबर 2021 या 12 महिण्यांपासून , वीजबिल भरण्याच्या घरूनबसल्या सुविधां उपलब्ध असतांनाही वीजबिल भरलेले नाही. या ग्राहकांनी दोन महिन्यापासून ते तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीची वीजबिलाची थकबाकी भरण्याची तसदी न घेण्यात धन्यता मानली आहे. वीजजोडणी कापल्या गेल्यानंतर मात्र पुणर्जोडणी साठी वीजबिल भरणा केंद्रावर जावून पुणर्जाेडणी शुल्काचा भरणा अधिक वीजबिल भरून वीजपुरवठा पूर्ववत करून घेतला आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालयांकडे आॅक्टोबर 2021पर्यंत थकबाकी 75 कोटी 64 लाख झाली असून,
थकबाकीसाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक,सरकारी कार्यालये व सरकारी कार्यालय अशा एकूण 18 हजार 746 वीज ग्राहकांचा वीजपुरवठा ऑक्टोबर 2020 ते ऑक्टोबर 2021 कालावधीत खंडीत करण्यात आला. तर थकबाकीदार ग्राहकांविरोधात महिनाभरापासून राबविण्यात येत असलेल्या मोहिमे अंतर्गत गेल्या 25 दिवसात 2 हजार 573 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
चंद्रपूर व गडचिरोली मंडलातील घरगुती ग्राहकांकडुन 49 कोटी 57 लाख येणे आहे, वाणिज्यिक गाहकांकडून 10 कोटी 66 लाख , औद्योगिक ग्राहकांकडुन 8 कोटी 87 लाख, सरकारी कार्यालये व इतर लघुदाब ग्राहकांकडून 6 कोटी 54 लाख येणे आहे.
थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित झाल्यावर वीजनियामक आयोगाच्या निर्देषानुसार नियमाप्रमाणे पुणर्जाेडणी शुल्क आकारण्यात येत आहे .
थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडीत झाल्यावर होणारी गैरसोय टाळून ग्राहकांनी वेळेत वीजबिल त्वरीत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांनी केले आहे.
महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून सध्या महावितरण आर्थिक बिकट परिस्थितीला सामोरे जात आहे. तर दुसरीकडे कोळसा टंचाईमुळे उदभवलेल्या परिस्थितीतही महावितरण विविध उपलब्ध स्त्रोताकडून तसेच खुल्या बाजारातून वीज खरेदी करून ग्राहकांपर्यंत वीज पोहोचविण्याचे कर्तव्य पार पाडत आहे व ग्राहकांनी वेळेवर स्वतःहून वीजबिल भरणे अपेक्षित असतांना महावितरणच्या अधिकारी व कर्मचा़री यांना थकबाकी वसुली करीता ग्राहकांच्या दारापर्यंत जावे लागत आहे.
आठवडयाचे सातही दिवस थकबाकीदारांविरोधात मोहिम राबविण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांकडून अनधिकृत वीज वापर आढल्यास वीजकायदा 2003च्या कलम 135 व कलम 138 अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे व त्यासाठी विशेष चमू गठीत करण्यात येवून त्यांच्याद्वारे फेरतपासणीही करण्यात येत आहे. थकबाकीदारांना वीजबिल भरणे सोईचे व्हावे यासाठी प्रत्येक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आहेत. वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना पर्यावरणपुरक अाॅनलाईन पेमेंट, मोबाईल अॅप, गुगल पे,पेटीएम या यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नियीमत ग्राहकांचा प्रतिसादही या सुविधांना चांगल्याप्रकारे लाभत असल्याचे चित्र आहे. नेट बैंकिंगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी याआधी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाईनद्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क आहे. तसेच ऑनलाईन बिल भरण्यासाठी 0.25 टक्के सूट दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत देण्यात येत आहे. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल एप किंवा इतर ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांनी केले आहे.