चंद्रपुरात विविध राजकीय पक्षांच्या युवकांनी एकत्र येऊन केली विदर्भ युवा फाउंडेशनची स्थापना

चंद्रपूर: विदर्भातील युवकांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध व्हावे , युवकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाच्या मदतीच्या पलीकडे जाऊन मदत करता यावी , सर्वसामान्य युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पक्षाच्या युवकांनी एकत्र येऊन विदर्भ युवा फाउंडेशन ची स्थापना केली आणि त्याची मुहुर्तमेढ महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिनी 2 ऑक्टोबरला युवा संमेलन 2021 घेऊन करण्यात आली.या संमेलनात समाजात विशेष योगदान देणाऱ्या श्रुती लोणारे बल्लारपूर , रूपल उराडे चंद्रपूर , आरती गंगोत्री चंद्रपूर आणि अनिकेत दुर्गे भंगाराम तळोधी या चंद्रपूर जिल्ह्यातील युवा ऊर्जास्त्रोतांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा . राजेश पेचे यांचयासह संस्थापक सदस्य राजीव कक्कड , सचिन कत्याल, मेघा रामगुंडे,नितीन भटारकर , सुरज घोंगे, यश दत्तात्रय, विनय धोबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघा रामगुंडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी विदर्भ युवा फॉउंडेशन ची भुमिका काय असणार आहे आणि त्या मागचा उद्देश्य बद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन देवेन्द्र मंडलवार यांनी केले. विदर्भ युवा फाउंडेशन हे चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपुर्ण विदर्भातील ग्रामीण भागातील युवकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारे फाऊंडेशन बनेल असा विश्वास यावेळी उपस्थित मार्गदर्शकांनी व्यक्त केला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here