- चंद्रपूर दि. 2 ऑक्टोबर: जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ताडी दुकाने सन 2021-22 या वर्षाकरिता ई-लिलाव निविदेद्वारे द्यावयाचे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडी दुकानांचे जाहीर ई-लिलाव निविदा प्रक्रिया दि. 4 ऑक्टोबर 2021 पासून शासनाच्या www.mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे. तसेच ताडी दुकानांचा जाहीर ई-लिलाव दि. 20 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. तरी सर्व ईच्छुक बोली धारकांनी याची नोंद घ्यावी. तसेच या ई-लिलाव निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवावा.
ताडी दुकानांची यादी, इतर नियम व ई-लिलाव निविदेबाबतच्या अटी व शर्तींची सविस्तर माहिती www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अधिक माहिती आवश्यक असल्यास अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर कळविले आहे.