उद्या भद्रावती येथे सरपंचांचा सत्कार व भव्य कार्यकर्ता मेळावा
चंद्रपूर : काँग्रेस पक्षाचा भव्य मेळावा उद्या गुरूवारी भद्रावतीच्या सेलेब्रेशन हाॅल येथे पार पडत असून या मेळाव्यात विविध पक्षातील अनेक नगरसेवकांसह अन्य लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकारी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असलेल्या या मेळाव्यात वरोरा विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात येणार आहे.
मेळाव्याचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होत असून यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देविदास काळे, महासचिव अविनाश वारजुरकर, माजी आमदार देवराव भांडेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेस शहराध्यक्ष रामू तिवारी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा चित्राताई डांगे, महिला शहराध्यक्ष सुनिता अग्रवाल, काँग्रेसच्या केंद्रीय प्रतिनिधी सुनिता लोढीया, प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, प्रदेश सचिव संदीप गड्डमवार शिवा राव, नम्रता ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
जिल्ह्यात घर घर में मन मन में ‘काँग्रेस’ ही संकल्पना राबवित इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन येत्या काळात काँग्रेस पक्षाचा अधीक विस्तार करणार आहे. भद्रावती येथील सेलिब्रेशन हॉल मध्ये सकाळी दहा वाजता हा सोहळा पार पडणार असून या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.