चंद्रपूर: भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे राज्याचे बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी नामदार विजय वडेट्टीवार यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. त्यामुळे आमदार पडळकर यांच्या विरोधात मंगळवार दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता येथील कस्तूरबा (गिरनार) चौकात चंद्रपूर शहर जिल्हा कांग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन आयोजित केले आहे.
तरी या आंदोलनाला काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याची विनंती चंद्रपूर शहर जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू ) तिवारी यांनी केली आहे.