अवघ्या दोन तासात सरकारी धान्य ट्रक चोरीचा गुन्हा उघड

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हयात मागील काही दिवसांपासुन वाहन चोरीचे गुन्हयात वाढ झाली असताना अशा गुन्हयांवर आळा घालण्यासाठी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक चंद्रपुर श्री. अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते. अशातच दिनांक २६/०७/२०२१ रोजी चे रात्री ०८:०० वाजताचे सुमारास पोलीस स्टेशन पडोली हद्दीत सरकारी धान्याच्या ट्रक क्र.एमएच ३४ बी.जी. ३९०७ हा त्रिमूर्ती होटेलजवळुन कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केला आहे. यावरून पोलीस स्टेशन पडोली येथे अप क. ११२ / २०२१ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर ट्रक चोरी प्रकरणाचा गुन्हा दाखल होताच याबाबत माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात गोपनीय माहिती काढण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक वेगवेगळया दिशेन रवाना होवुन ट्रकचा शोध सुरू केला. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक श्री. खाडे यांना आणि त्यांचे अधिनस्त पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा चोरीस गेलेला ट्रक हा बल्लारशाहच्या दिशेने गेलेला आहे. अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने सदर ट्रक विसापुर टोलनाक्याजवळ अडवुन ट्रक चालवित असलेला इसम आरोपी नामे दिगांबर बापुराव केंद्रे वय २६ रा. वंजारी गुडा पो. लिंगापुर ता. शिरपुर जि. आदिलाबाद तेलंगाणा यास ताब्यात घेतले.

सदर आरोपीकडुन गुन्हयात चोरीस गेलेला माल २० टन शासकीय धान्य किं. ४,००,००० रू आणि ट्रक क एमएच ३४ बीजी ३९०७ किं. ११,००,००० असा एकुण १५,००,००० रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक चंद्रपुर श्री. अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोनि श्री. खाडे यांचे नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, सफौ राजेंद्र खनके, पोहवा महेंद्र भुजाडे, पोना जमीर खान, मिलींद चव्हाण, अनुप डांगे, पोशि. गणेश भोयर, प्रदीप मडावी, गणेश मोहुर्ले, गोपीनाथ नरोटे, विनोद जाधव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here