बुरखाधारी मुख्य आरोपीला चंद्रपूर शहर पोलीसांनी केली अटक

चंद्रपूर: दिनांक १२/०७/२०२१ रोजी दुपारी १४:३० वाजता सुमारास पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत रघुवंशी कॉम्पलेक्स येथे जखमी नामे आकाश उर्फ चिन्ना आनंद अंदेवार वय ३० वर्ष, रा. राणी लक्ष्मीबाई स्कुल आंबेडकर वार्ड, बल्लारशाह जि. चंद्रपूर हा घटनास्थळी रघुवंशी कॉम्पलेक्स येथे नाश्ता करण्याकरीता गेला असता तेथे बुरखाधारी युवकाने त्याचेजवळील अग्नीशस्त्राने फायर करून त्याचा जिव घेण्याचा प्रयत्न करून तेथून पळ काढला. त्यावेळी त्याचेसोबत इतर २ युवकही सोबत होते.

अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे वरील प्रमाणे गुन्हा नोंद करुन करण्यात आला असुन सदर गुन्हयाचे घटनास्थळी लगेच पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिलवंत नांदेडकर, पोलीस निरीक्षक श्री सुधाकर आंभोरे व पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचुन जखमीला तात्काळ सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे औषधोपचाराकरीता दाखल करण्यात आले. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याचे नातेवाईकांनी त्याला प्रथम डॉ. कुबेर यांचे खाजगी दवाखान्यात तदनंतर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता भरती करण्यात आले. नागपूर येथील सदर खाजगी रुग्णालयात पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जखमीचे जबाब नोंदविले. दरम्यान काळात मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री अरविंद साळवे, आणि अपर पोलीस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिलवंत नांदेडकर, पोलीस निरीक्षक श्री सुधाकर आंभोरे यांचे नेतृत्वात वेगवेगळी तपास पथके नेमण्यात येवुन मारेकरी युवकांचा शोधाशोध सुरु करण्यात आले.

तपासात प्रथम बल्लारशाह येथील रहिवासी असलेला मुख्य आरोपी नामे अंकुश ग्यानसिंग वर्मा वय ३६ वर्ष आणि आरोपी नामे अमीत बडकुराम सोनेकर वय २२ वर्ष रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारशाह यांना दिनांक १३/०७/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अटक केली तर गुन्हयात अग्नीशस्त्राने फायर करणारा बुरखाधारी आरोपी नामे चंद्रेश उर्फ छोटु देशराज सुर्यवंशी वय २० वर्ष रा. तिळक वार्ड बल्लारपुर यास पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील तपास पथकाने मोठ्या शिताफीने त्याचा पाठलाग करुन त्यास अटक करण्यात येवून त्याचे कडुन गुन्हयात वापरलेला अग्नीशस्त्र (पिस्तुल) जप्त करण्यात आले आहे.
सदर गुन्हयातील तिन्ही अटक आरोपीचा पोलीस कोठडी रिमांड घेवुन पुढील तपास सुरु आहे.

सदर गुन्हा उघडकीस आणुन त्यातील गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यासाठी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील पोलीस निरीक्षक श्री सुधाकर आंभोरे, पोउपनि श्री निलेश वाघमोर, विजय कोरडे, विठठल मोरे, आणि सफौ दौलत चालखरे, पोहवा रविंद्र मानकर, पोना जयंता चुनारकर, पोशि रुपेश रणदिवे, चेतन गर्जलावार, सचिन राठोड, मंगेश गायकवाड, मपोशि पुष्पा काचोळे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी श्री बाळासाहेब खाडे, पोउपनि संदीप कापडे, पोउपनि सचिन गदादे व त्याचे पथकाने मदत केली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री अरविंद साळवे, आणि अपर पोलीस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिलवंत नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक श्री सुधाकर आंभोरे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक श्री विठठल मोरे, पोहवा रविंद्र मानकर, पोशि सचिन राठोड, मंगेश गायकवाड मपोशि पुष्पा काचोळे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here