चंद्रपुरातील प्रमुख व्यापारी संघटनांची व्यापारात शिथीलता मिळावी यासाठी रामू तिवारी यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांशी चर्चा !

व्यापाऱ्यांच्या मागणीवर पालकमंत्री सकारात्मक !

चंद्रपूर : मागील दोन महिन्यापासून चंद्रपूर जिल्ह्यातील व्यापार हे बंद आहे व व्यापाऱ्यांनी शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन केले. नुकतेच शासनाने जाहीर केलेल्या धोरणानुसार 10 टक्केपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्ह्याना शिथीलतेतून वगळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून त्यासंदर्भात आज मंगळवार, 1 जून रोजी जिल्ह्यातील काही प्रमुख व्यापारी संगठनेच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष रामू तिवारी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन सदर समस्या सांगितली असता रामू तिवारी यांनी पालकमंत्र्यांशी ऑनलाइन चर्चा घडवून आणली.संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांच्याशी वीडियो कॉल वर ऑनलाइन चर्चा केली असता पालकमंत्र्यांनी सदर प्रकरणात विशेष प्रयत्न करुन लवकरच जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना दुकाने खोलण्यासाठी सुट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांचे दारूबंदी हटवल्या बद्दल अभिनंदन केले व व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय पालकमंत्री घेणार अशी आशा व्यक्त केली. यावेळी प्रमुखतेने रामकिशोर सारडा, रामजीवन परमार,दिनेश बजाज,सुमेध कोतपल्लीवार, नरेंद्र सोनी, संदीप माहेश्वरी,पंकज शर्मा,दिनेश नथवानी, राकेश टहलियानी, चिराग नथवानी, नरेश मोटवानी आदि व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here