देशाच्या विकासात राजीव गांधी यांचा मोठा वाटा:खासदार बाळू धानोरकर

-चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे मास्क,सॅनिटायझर वाटप

चंद्रपूर : स्व. राजीव गांधी यांनी देशात डिजिटल क्रांती घडविली. १८ वर्षे वयोगटातील प्रत्येक नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, असा निर्णय घेतला. पंचायत राज बळकटीकरणासोबतच सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. देशात विविध योजना सुरू केल्या. त्यामुळे देशाच्या विकासात राजीव गांधी यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात स्व. राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (ता. २१) आयोजित कार्यक्रमात खासदार धानोरकर बोलत होते. यावेळी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कस्तुरबा चौकात मास्क, सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना मदत व्हावी या उद्देशातून शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सहायता कक्ष सुरू केले आहे. या कक्षाच्या माध्यमातून कोरोना रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना चोवीस तास मदत केली जात आहे. प्रत्येक नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. तरीदेखील आलेल्या संकटकाळात काँग्रेस पक्ष प्रत्येकांच्या पाठिशी अविरत उभा राहणार असल्याचे आश्वासन यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी यावेळी दिले.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष अश्विनीताई खोब्रागडे, माजी नगरसेवक प्रवीण पड़वेकर, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, ओबीसी विभाग शहर अध्यक्ष नरेंद्र बोबडे, ओबीसी विभागाचे प्रदेश महासचिव उमाकांत धांडे, माजी नगरसेवक राजेश रेवल्लीवार, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, माजी नगरसेवक बापू अंसारी, एनएसयुआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, ओबीसी विभागाचे राष्ट्रीय सचिव मोहन डोंगरे, पप्पू सिद्दीकी, राजू वासेकर, केतन दुरसेल्वार, मोनू रामटेके, वैभव येरगुडे, कासिफ अली, धरमु तिवारी, मिनल शर्मा, आकाश तिवारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्ह्यात दोन स्वर्गरथ, दहा रुग्णवाहिका
जिल्ह्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजविला आहे. शहरापासून गावखेड्यापर्यंत रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खासदार निधीतून चंद्रपूर शहर व जिल्ह्यासाठी दोन स्वर्गरथ आणि दहा रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचे आश्वासन खासदार बाळू धानोरकर यांनी यावेळी केले. चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे या मागणीसाठी पाठपुरावा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here